निवडणुकीचे काम निपक्ष व निर्भिडपणे करा – मिलींदकुमार वाघ

0
88

अमळनेर ः प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निःपक्ष व निर्भीडपणे करावे. निवडणूक प्रक्रियेतील आपले कर्तव्य समजून घ्यावे व आपल्याकडून चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी आपली नेमणूक होईल त्याठिकाणी तेथील पोलीस पाटील व इतर कर्मचारी मदत करतील. त्यामुळे आपण निवडणुकीचा कोणत्याही प्रकारचा बाऊ न करता निवडणूक प्रक्रिया प्रामाणिकपणे निःपक्षपणे पार पाडावी, असे अमळनेर येथील शिवाजी नाट्य सभागृहात ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वाघ मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी शिवाजी नाट्य सभागृहात अमळनेर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रात्यक्षिक निवडणुकीचे तलाठी पिंटू चव्हाण, वाल्मिक पाटील यांनी करून दाखवले. यावेळी नायब तहसीलदार उपस्थित होते. प्रशिक्षणात तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी प्रोसिडिंग ऑफिसर व निवडणूक अधिकारी १,२ व ३ यांची कामे समजून सांगितले. सकाळी माँकपोल कसे करावे हे सांगत महत्त्वाची कागदपत्रे कशी अद्यावत करावी, याचे सखोल असे मार्गदर्शन केले.
कर्मचार्‍यांच्या या समस्यांबाबत शेवटी त्याचे निरसन वाघ यांनी केले. बोगस व तोतया मतदार असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असे सांगत आणीबाणीच्या वेळेस झोनल अधिकारी यांची मदत लागली तर त्यांची मदत घ्यावी. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची महसूल विभागाने पूर्णपणे तयारी केली आहे. अजून कर्मचार्‍यांचा दुसरा प्रशिक्षण वर्ग पुढील आठवड्यात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here