धानोरा ता.चोपडा (वार्ताहर ) :— निखिल अनिल बडगुजर याने कोकण ज्ञानपीठ काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कर्जत येथे बी.ई.मॅकेनिकल ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्याने पुढील उच्च शिक्षणासाठी Nottingham Union University Englend ( UK ) नाॅटिंगहम युनियन विद्यापीठ इंग्लंड येथे रवाना झाला .निखिल याने पुढील शिक्षणासाठी इंग्लंड येथे Industrial Management (इंडस्ट्रीअल मॅनेजमेंट) या विषयाची निवड केली आहे. चि.निखिल हा चिंचोली ता.यावल येथिल मधुकर दामु बडगुजर यांचा नातु तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलेले अनिल बडगुजर यांचा द्वितीय मुलगा आहे.अनिल बडगुजर यांचा मोठा मुलगा अभिषेक बडगुजर हा देखील चार वर्षे पुर्वी अमेरिकेत एम.एस चे उच्च शिक्षण घेवुन तिथे नोकरी करीत आहे.निखिल बडगुजर हा देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी नुकताच मुंबई येथुन इंग्लडला रवाना झाला. निखिल हा इंग्लड येथे पुढील शिक्षणासाठी रवाना झाले मुळे त्याचे वसई येथील एकनाथ बडगुजर ; दिपक बडगुजर ; वरूण बडगुजर ; धरणगाव येथिल माजी नगरसेवक बाजीराव बडगुजर ; महेन्द्र बडगुजर ; सुमित बडगुजर ; वासुदेव अजस्त्रगोल ; चोपडा येथिल राजेन्द्र मांडेवाल ; श्रीराम बडगुजर ; कुंदन बडगुजर ; सदाशिव बडगुजर व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.निखिल हा चिंचोली प्रतिनिधी नितिन बडगुजर यांचा पुतण्या आहे