निंभोरा ता.रावेर ः प्रतिनिधी
येथील तरुणांनी नववर्षाच्या स्वागताचे पारंपारिक किंवा जल्लोष करून साजरा न करता युवाशक्ती मित्र परिवारातर्फे दि.१ जानेवारी रोजी स्मशान भूमीतील साफ सफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्याचे अनोखे काम करण्यात आले.
या वेळी स्मशान भूमीतील अस्ताव्यस्त पडलेले प्रेतांचे पुष्पहार, शाली, कापड आदी वस्तूंची सफाई करण्यात आली तसेच स्मशान भूमी झाडून कचरा पेटवित सर्व स्मशान भूमी स्वच्छ करण्यात आली.यावेळी सदर सफाई अभियानास युवाशक्ती मित्र परिवाराचे हर्षल ठाकरे, सुनील कोंडे, दिलशाद शेख, रवींद्र बारी, युगल राणे, राज खाटीक,गौरव काटोले, किरण कोंडे, उज्वल भोगे, मुकेश सावकारे, शेख नदीम यांसह आदी तरुणांनी सहभाग घेतला.
या आधी ही संत गाडगे महाराज जयंती, शिवजयंती आदी निमित्त व्याख्याने ,वस्तुवाटप असे कार्यक्रम युवाशक्ती मित्र परिवारातर्फे भेटले जात असून या उपक्रमाचे निंभोरा ग्रामस्थांनी कौतुक केले.
काही ठिकाणी युवा पिढी नववर्षाचे स्वागत जल्लोष करून फटाके फोडून किंवा चंगळवादी होऊन साजरी करते मात्र या पद्धतीला फाटा देत समाजहिताच्या कामाला प्राधान्य देऊन आम्ही युवाशक्ती परिवार सफाई अभियान दरवर्षी राबविते.
-हर्षल ठाकरे, प्रमुख,
युवाशक्ती परिवार, निंभोरा.