जळगाव ः प्रतिनिधी
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत शनिवार १३ फेब्रुवारी रोजी जळगाव दौर्यावर येणार आहेत.सकाळी ११ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात …उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ या अभिनयांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय जळगाव या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय जळगाव हा कार्यक्रम दि.१३ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील व संचालक, उच्च शिक्षण विभागातील अधिकार्यांसमवेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या ुुु.र्पाी.रल.ळप या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयजळगाव ही विशेष लिंक निर्माण केली आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी आपले निवेदन दि. ११ फेब्रुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना ऑनलाईन पध्दतीने निवेदन सादर करणे शक्य नाही, त्यांनाही प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले निवेदन सादर करता येईल. त्यासाठी आयोजनस्थळी टोकन प्रणाली असेल अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी दिली आहे.