भुसावळ, प्रतिनिधी । पत्र म्हणजे दोन मनांचा संवाद. भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पत्र लिहून भुसावळ कला विज्ञान आणि पु . ओं .नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पत्राच्या माध्यमातून संवाद साधला. निमित्त होते भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली त्याबद्दल आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धेचे.
विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम जागृत करणारी हे अभिनव स्पर्धा भारतीय डाक पोस्ट खात्याच्या मार्फत संपूर्ण भारतात आयोजित केलेली आहे. या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शेकडो पत्रं लिहिली. मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतून पत्र लिहीत विद्यार्थ्यांनी 2047 मध्ये माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल? आणि स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित नायक या विषयांवर अतिशय समर्पक भाषेत आपले विचार मांडून थेट पत्रातून संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्याशी.
या स्पर्धेतून उत्कृष्ट दहा पत्रांची निवड करण्यात आली आणि ते थेट पंतप्रधान कार्यालयाकडे पोस्टामार्फत पाठवण्यात आली. हे पत्र महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे. उपप्राचार्य डॉ. बी. एच .बऱ्हाटे उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे. यांच्या हस्ते पोस्टमन श्री पराग वळवी यांना सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी प्रा महेश गोसावी. प्रा जयंत बेंडाळे. प्रा आर एम खेडकर, आदी उपस्थित होते.
हे पत्र भुसावळ मतदार संघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने, माजी मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांच्याही माध्यमातून या उपक्रमाचे कौतुक करून या पत्रांना यांच्या शुभहस्ते दिल्लीकडे रवाना करण्यात आले. या पत्रांचे वाचन आणि अवलोकन करून त्यांनी नाहाटा महाविद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत महाविद्यालयाच्या विकासात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालय करीत असलेल्या प्रयत्नांची ही कौतुक याप्रसंगी त्यांनी केलं.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक शोभा तळेले, समन्वयक, प्रा. आर एम खेडकर, प्रा. स्वाती पाटील, प्रा टी. एस सावंत, स्पर्धा प्रमुख प्रा एम ए चौधरी, भगवान तायडे, सचिन पाटील, अतुल किनगे. गोकुळ फालक, सर्व सहकारी शिक्षकांनी सहकार्य केले.