नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

0
14

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील गणित विभागातर्फे श्रीनिवास रामानुजन अय्यंगर यांचा 134 वा जन्मदिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस्. व्ही. पाटील यांनी अध्यक्षस्थानी होते .कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.एच इंगोले यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या बद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा. ए.पी नवघरे यांनी केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस्. व्ही. पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात रामानुजन यांच्या जीवनातील उदाहरण सांगून रामानुजन हे रॉयल सोसायटी ऑफ लंडन इथली फेलोशिप मिळवणारे सर्वात कमी वयातील गणितज्ञ होते हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी गणिताचे जीवनातील महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. डॉ. एस .व्ही .पाटील, प्रा. डॉ. बी.एच . बऱ्हाटे प्रा. डॉ. ए. डी .गोस्वामी, प्रा.डॉ.एन.ई.भंगाळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. डाॅ.के. के. अहिरे ,प्रा डॉ. जे एफ .पाटील प्रा. डॉ. पी .ए. अहिरे, प्रा. व्ही. ए. सोळुंके, प्रा. डॉ. दीपक शिरसाट , प्रा. उज्वला महाजन ,प्रा.भारती सोनवणे, प्रा. वंदना महाजन, प्रा. डॉ .राजेंद्र तायडे , प्रा.डॉ. ललित तायडे गणित विभागातील प्रा. प्रणिता राणे, प्रा. नेहा महाजन, प्रा.काजल वारके, प्रा.अनिकेत शिरोडे, प्रा.रुची भावसार, प्रा.तुबा देशमुख विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते . प्रा. प्रणिता राणे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here