नाहाटा महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

0
14

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील तत्वज्ञान विभाग आणि नवी दिल्ली च्या भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . मोहनभाऊ फालक होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री महेशभाऊ फालक, सचिव – श्री विष्णुभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष – श्री संजयजी नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ .बी .एच. ब-हाटे , उपप्राचार्य डॉ . एस . व्ही .पाटील ,उपप्राचार्य डॉ . एन . ई . भंगाळे ,उपप्राचार्य डॉ . ए . डी . गोस्वामी . समन्वयक डॉ . सचिन राजपूत आदी व्यासपीठावर उपस्थित होते . संस्थेचे अध्यक्ष मोहन भाऊ फालक यांच्या हस्ते वृक्षास पाणी देऊन व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ . मोहनभाऊ फालक म्हणाले की मानवी जीवनात तत्वज्ञाना ला फार मोठे महत्त्व हे .जीवन जगत असताना जीवनातील पद्धती, रीती, नीतिमूल्य, परंपरा या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून जीवन सुकर होते .मानवी जीवनात तत्त्वज्ञानाला फार मोठे महत्व असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

सदर व्याख्यानमाला तीन सत्रात घेण्यात आली . पहिल्या सत्रात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ . श्रीधर आकाशकर म्हणाले – तत्वज्ञानाच्या क्षेत्रात भक्ती संप्रदायाचे मोठे योगदान आहे . तत्त्वज्ञान म्हणजे काय? भारतीय तत्त्वज्ञान , तत्त्वज्ञानाचा संबंध ,भक्तीचा प्रकार, समता, बंधुता, नैतिकता ,मानवता धर्म, या विषयावर त्यांनी सखोल माहिती दिली.

या सत्राचे सूत्रसंचालन तत्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ . पी . ए .अहिरे यांनी केले . तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ .दीनानाथ पाठक यांनी करून दिला. आभार डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी मानले. दुसऱ्या सत्रात जळगाव येथील एम . जे. महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ . रजनी सिन्हा होत्या . यावेळी त्या म्हणाल्या -प्राचीन भारतीय साहित्यात तत्त्वज्ञानाने मूल्य रुजवली आहेत .तत्त्वज्ञाना मुळे मानवाला योग्य दिशा मिळते . आजच्या काळात पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज बनल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा . पुरुषोत्तम महाजन यांनी केले . तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा . डॉ . राजेंद्र तायडे यांनी करून दिला . तिसऱ्या सत्रात सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे प्रा . डॉ . हरीशचंद नवले होते . ते यावेळी म्हणाले की -आधुनिक युगात तत्त्वज्ञानाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे . तंत्रज्ञानामुळे व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र बदल होत असून त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच ओळख निर्माण होते .व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी तत्वज्ञानाची फार मोठी गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले . सूत्रसंचालन व आभार प्रा . आशिष नवघरे यांनी मानले . या वेळी विविध विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक ,प्राध्यापिका, विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here