भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी “हेडस ऑफ इन्कम अँड इट्स प्रोविसनस” या विषयावर ऑनलाइन सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई.भंगाळे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून भुसावळ शहरातील चार्टर्ड अकाउंटंट दीपक मेहरानी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आयकर ला फक्त अभ्यासक्रमा पुरते मर्यादित न ठेवता त्याचे आर्थिक व्यवहारात असलेले महत्त्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आयकर म्हणजे काय, आयकर साठीचे विविध उत्पन्न स्रोत, जसेकी जसे की इनकम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रोपर्टी, बिझनेस अँड प्रोफेशन, कॅपिटल गैन, इनकम फ्रॉम अदर सोर्सेस, विविध हेडस मध्ये समाविष्टअसलेले विविध उत्पन्न, उपलब्ध असलेले विविध डिडक्शन तसेच कर जबाबदारी ठरविताना लक्षात घ्यावयाच्या आयकर कायद्यातील विविध कलम व तरतुदी या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. एन.ई.भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना इन्कम टॅक्स या विषयाला अभ्यासक्रमाचा एक विषय म्हणून न पाहता त्यातील असलेल्या विविध करिअरच्या संधी लक्षात घ्या असे सांगितले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना इन्कम टॅक्स चे आर्थिक व्यवहारात महत्व सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ममता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्मिता बेंडाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. रश्मी शर्मा, प्रा.डॉ.पी.के पाटील, प्रा.के.पी.पाटील, प्रा.खीलेश पाटील, प्रा. सपना कोल्हे, प्रा. भूषण चौधरी, प्रा. वर्षा पाटील, प्रा स्वाती शेळके, प्राध्यापक जयश्री चौधरी, प्रा.आकाश तायडे, प्रा. हेमंत सावकारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस. व्ही. पाटील, प्रा.डॉ.बी. एच. बऱ्हाटे, प्रा.डॉ. ए. डी. गोस्वामी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.