भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी .ओ . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे तर उद्घाटक म्हणून सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट ,(गुजरात )येथील प्रा. डॉ.राकेश जोशी आभासी पद्धतीने उपस्थित होते .त्यांच्या समवेत उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे. उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी व आभासी पद्धतीने उपप्राचार्य डॉ एस. व्ही. पाटील तसेच समन्वयक डॉ. प्रफुल्ल इंगोले व सह समन्वयक प्रा. एस.टी .धूम सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे यांनी अध्यक्षीय समारोप केला त्यांनी संशोधनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येक क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता आहे .संशोधनाशिवाय देशाचा व जगाचा विकास शक्य नाही अशा भावना व्यक्त करून राष्ट्रीय कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ राकेश जोशी यांनी “सम बेसिक स्टॅटिस्टिकल टूल्स इन सोशल सायन्स रिसर्च,”या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सर्वप्रथम संशोधन, संशोधनाचे महत्त्व ,संशोधनाची व्याप्ती यावर भाष्य करून केवळ एका क्षेत्रात संशोधन करून चालत नाही तर शास्त्राचे जेवढे प्रकार आहेत .त्या प्रत्येक शास्त्रात संशोधन होणे गरजेचे आहे . शेती ,उद्योग, व्यापार ,वाहतूक, दळणवळण ,आरोग्य ,शिक्षण, मनोरंजन या सर्व क्षेत्रांमध्ये संशोधनाची आवश्यकता आहे यावर भाष्य करून सर्व शास्त्रीय संशोधनामध्ये सांख्यिकीचा वापर केला जातो .संशोधनाचे प्रमुख सहाय्यक साधन म्हणून सांखिकीकडे पाहिले जाते. सांख्यिकीमध्ये परिस्थिती व गरजांनुसार वेगवेगळी साधने वापरली जातात .समांतर माध्य, मध्यका, चतुर्थ विचलन, गुणोत्तर माध्यम ,सहसंबंध ,प्रतिपगमन या सारख्या साधनांचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. बी. वाय. कुलकर्णी, निवृत्त राज्यशास्त्र विभाग प्रमुख, जे. ई.एस .कॉलेज जालना यांनी “न्यू ट्रेंड्स इन द रिसर्च ऑफ सोशल सायन्सेस” या विषयावर मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी संशोधन , संशोध दृष्टीकोण , ज्वलंत प्रश्नावर संशोधन झाले पाहिजे, संशोधकाच्या मनात कुठलाही पूर्वग्रह नसला पाहिजे ,संशोधन करताना ध्येय, उद्दिष्टे निश्चित असले पाहिजे इत्यादी गोष्टीवर भर दिला पाहिजे असे सांगितले. अर्थशास्त्र व इतिहास विषयात संशोधनासाठी मोठा वाव आहे हे ही त्यांनी नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले .सूत्रसंचालन प्रा. डॉ. ललित तायडे ,प्रा. विलास सोळुंके , प्रा. डॉ. दीपक शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस.टी. धूम यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा. डॉ. किरण वारके ,प्रा. डॉ. उज्वला महाजन, प्रा. शितल सोनवणे ,प्रा.श्रीपाद वाणी प्रा. डॉ. सचिन राजपूत ,प्रा. आशिष नवघरे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळा आभासी पद्धतीने घेण्यासाठी संगणक विभाग, विभागातील हर्षल पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले