भुसावळ, प्रतिनिधी । आधार कार्ड आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक शैक्षणिक, आर्थिक ,विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक असतं. ही विद्यार्थ्यांची गरज ओळखून भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ नाहाटा महाविद्यालयात आधार अपडेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आधार अपडेट करून याचा लाभ घेतला.
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरल मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करताना आधार कार्ड अपडेट नसेल तर विद्यार्थी संख्या गणली जात विद्यार्थी संख्या अभावी शिक्षक सरप्लस होण्याची शक्यता असते. शिक्षक सरप्लस होऊ नये. आणि महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या हेतूने महाविद्यालयातच या विविध सेवा एकाच ठिकाणी या सुविधा केंद्रामार्फत देण्याचा उद्देश असल्याचं उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी याप्रसंगी सांगितलं.
प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी या उपक्रमाचं कौतुक करून कनिष्ठ महाविद्यालय करत असलेल्या प्रयत्नांत बद्दल गौरव उद्गार काढले. विद्यार्थ्यांना सुविधा कमीत कमी कागदपत्रांमध्ये आणि महाविद्यालयाच्या परिसरातच उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आणि आधार अपडेशन करणे कसेआवश्यक आहे, याचं महत्त्व समजावून सांगितले. प्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे यांनी अशा उपक्रमांना भविष्यात संगणक विभागातर्फे आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,
या आधार अपडेशन कॅम्पस आयोजन स्वर्गीय नानासाहेब देविदास गोविंद फालक ,यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या विद्यार्थी माहिती मार्गदर्शन आणि सहाय्यता केंद्र, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन, कार्यालय यांच्या समन्वयातून करण्यात आले.या कॅम्पचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन महेश भाऊ फालक , प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस व्ही पाटील, उपप्राचार्य उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समन्वयक प्रा. टी एस सावंत, प्रा खेडकरआर एम, प्रा स्वाती पाटील, प्रा एन वाय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
कॅम्पच्या समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन भाऊ फालक , सचिव विष्णू भाऊ चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. एन इ.भंगाळे, डॉ. ए.डी गोस्वामी, भारतीय डाक विभागाचे यूपी दुसाने , एस एस मस्के, संदेश पाटील, एन पी दाणे, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि कार्यालयाचे सहकार्य लाभले.