नारीशक्ती ग्रुपतर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी – आजोबांसाठी चष्मे वाटप

0
30
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । नारी शक्ती ग्रुप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी नेत्र तपासणी शिबिर मांगीलालजी बाफना नेत्रपेढी जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

यात आदित्य ढवळे पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था बेघर निवारा केंद्र येथील एकूण 32 जणांची नेत्रतपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान व आर सी बाफना फाऊंडेशन संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय या ठिकाणी डॉ.नयना उभाड पाटील एम. एस.ऑप्थो. यांनी केली व नेत्र तपासणीतून चष्मे तयार करण्यात आले असून चष्मे वाटप महापौर जयश्री महाजन, उपायुक्त शाम गोसावी व इतर मान्यवरांच्य्या हस्ते करण्यात येणार आहे.

बऱ्याचदा आपण बघतो की वाढदिवस हे पुष्पगुच्छ देऊन केक कापून अथवा अन्नदान करून साजरे केले जातात. पण नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष मनिषा पाटील व सौ सुमित्रा पाटील यांचा वाढदिवस याला अपवाद असुन बेघर निवारा केंद्र येथील आजी आजोबांसोबत येत्या हिवाळ्याची चाहूल पाहता गरजूंना स्वेटर वाटप करून साजरा करण्यात येणार असून समाजापुढे एक आदर्श निर्माण करीत आहे. यात नारीशक्ती पदाधिकारी अध्यक्ष मनीषा पाटील, सुमित्रा पाटील, ॲड. सीमा जाधव, ज्योती राणे, भावना चौहान, ॲड. वैशाली बोरसे, नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी आदींची उपस्थितीत २ रोजी सकाळीं ११. ३० वाजता आदित्य ढवळे बहुद्देशीय बेघर निवारा केंद्र जळगाव येथे संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here