नाबार्ड प्रायोजित उद्योगिनी मेळाव्याचा समारोप

0
46

जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव पीपल्स बँक आयोजित व नाबार्ड प्रायोजित महिला बचत गटांच्या उत्पादनांचा मउद्योगिनी मेळावा २०२१ चे आयोजन दि. १८ ते २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत यशोदया हॉल, रिंग रोड, जळगाव येथे शासनाने जाहिर केलेले कोविड-१९ चे सर्व नियम काटेकोरपणे पाळून करण्यात आले होते.त्यास जळगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
१८.०२.२०२१ रोजी सदर मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर भारतीताई सोनवणे व उपमहापौर सुनिल खडके यांच्या हस्ते व नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, मनपा माजी सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, बँकेच्या बचतगट प्रमुख शुभश्री दप्तरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
२० फेब्रुवारी रोजी उद्योजक-ग्राहक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कृषि उपसंचालक अनिल भोकरे, कलश फार्माचे तुषार नेहेते, निखील फुडसच्या अलकाताई कुळकर्णी यांनी उपस्थित बचत गटातील महिलांना अनमोल मार्गदर्शन केले.जेणेकरुन बचत गटातील महिलांची उत्पादने उत्कृष्ट प्रतीचे बनवून ते विदेशापर्यंत कसे पोहचतील या बाबतची माहिती दिली.
२१ रोजी जिल्हा परिषदेचे सीइओ बी.एन.पाटील यांचे उपस्थितीत सदर मेळावाचा समारोप करण्यात आला. सदर प्रसंगी सर्व सहभागी बचत गटांना सहभाग प्रमाणपत्र आणि पाच उत्कृष्ट बचत गटांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रथम पुरस्कार रणाइचे अमळनेर येथील जागमाता महिला बचत गटाला देण्यात आला.
बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी माहिती दिली की, सदर मेळाव्यामध्ये महिला बचत गटांव्दारे बनविण्यात येणारी उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गुणवत्ता असलेली उत्पादनांची मार्केटींग केले जावे तसेच सदर उत्पादनांना विदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here