जळगाव ः शहर प्रतिनिधी
स्व. निखिल खडसे यांच्या जयंती निमित्ताने आज नाथ फाऊंडेशनच्या वतीने जळगाव मनपा मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट,सॅनेटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले तसेच गोरगरीब अंध व दिव्यांग बंधूंना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील ,युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, नाथ फाऊंडेशनचे अशोक लाडवंजारी, सुनिल माळी यांच्या हस्ते मूकबधिर विद्यार्थ्यांना ब्लँकेट तसेच पाच लिटर सॅनेटायझर, थर्मामीटर, मास्क इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. निखील खडसे जयंतीनिमित्त या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले होते.त्यानंतर जळगाव वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती कक्षात महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनिल माळी,दीपक फालक, माजी नगरसेवक राजू मोरे, अशोक पाटील, दिलीप माहेश्वरी, शर्मा,पिंजारी, योगेश लाडवंजारी, प्रदीप पाटील,विशाल देशमुख, जयेश पाटील, गणेश पाटील,किशोर नेवे, राजेंद्र वाणी, जितेंद्र पाटील यांच्यासह नाथ फाउंडेशनचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.