चाळीसगाव प्रतिनिधी – नागपूर जिल्हयातील कळमेश्वर तालुक्यातील पत्रकार योगेश नानाजी कोरडे यांना कर्करोगाने ग्रासले आहे.गत 6 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांना डीफ्यूज लार्ज बी सेल लिंफोमा हा कर्करोग झाला आहे.आधी त्यांच्यावर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कॅन्सर रूग्णालयात उपचार सुरू होते.आता त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टियूट येथे उपचार सुरू आहेत.उपचाराचा खर्च अधिक असल्यामुळे त्यांनी डिस्चार्च करून घेतला.त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. घरचा एकमेव कर्ता योगेश हा कोरोनाच्या काळात कर्करोगाशी झुंज देत आहे. त्यामुळे योगेशच्या मदतीसाठी समाजाने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन पत्रकार संघटनेच्या वतीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव येथील दिवगंत सूर्यभान घोडेस्वार प्रतिष्ठानच्या वतीने आर्थिक मदत पत्रकार योगेश कोरडे यांच्या कुटुंबियांना करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील घोडेस्वार यांचे आभार मानले आहे.