नशिराबाद येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

0
23
बडतर्फ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून केला गोळीबार

जळगाव प्रतिनिधी । २३ वर्षीय तरूणीने राहत्या घरात रात्री ९ वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद नशिराबाद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

कल्याणी लक्ष्मण मिश्राम (वय-२३) रा. वर्धा ही तरूणी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण पुर्ण करून जळगाव शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग संदर्भात प्रशिक्षण सुरू होते. घरी मुक्तेश्वर नगरातील गणेश वाणी यांच्या घरात भाड्याने राहत होती. कल्याणीने रविवारी १७ ऑक्टोबर रोजी रूमवर एकटी असतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापुर्वी तिने बेड सुसाईड नोट लिहून ठेवली होती. हा प्रकार रात्री ९ वाजेच्या सुमारास घरमालक वाणी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नशिराबाद पोलीसांशी संपर्क करून माहिती दिली. यावेळी पंचनामा केला असतान सुसाईड नोटदेखील आढळून आली. त्यात तीने म्हटले आहे की, मी माझ्या स्वखुशीने आत्महत्या करीत असून आई-बाबा मला माफ करा, आणि माझा दफनविधी हा मातीत गाळून करावा, मि स्व खुशीने आत्महत्या करित आहे” असे लिहिलेले आढळले. पोलीसांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला.

याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास उपपोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत असून घटनास्थळावर रवींद्र इधाटे व पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here