यावल, प्रतिनिधी । भुसावळ जळगाव महामार्गाला लागून असलेल्या नशिराबाद येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता हे आपल्या कार्यालयात सोयीनुसार मर्जीनुसार अवेळी उपस्थित राहत असल्याने पर्यायी कार्यालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितपणा येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत दि.20डिसेंबर2021 रोजी कार्यकारी अभियंता जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नशिराबाद येथील नितीन रंधे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की नशिराबाद येथील म.रा.वि.वि.कं.उपविभागीय अभियंता व कर्मचाऱ्यांचे मर्जीनुसार कार्यालय उघडत असतात व बंद करत असतात कार्यालय बंद करण्याची वेळ संध्याकाळी 6:15 वाजेची असताना कार्यालय 5 वाजता बंद होत असते.याबाबत सावकारे साहेब यांना भ्रमणध्वनी वरून बऱ्याच वेळा संपर्क साधाला आहे.परंतु कोणतीही कार्यवाही होत नाही नशिराबाद उपविभाग
कार्यालयाचे कर्मचारी श्रावगी हेच कार्यालयात उपस्थित असतात. बाकी सावकारे साहेब याच्यासह ईतर कोणताही कर्मचारी कार्यालयात दिसत नाही. कर्मचारी पुर्णपणे कार्यालयात
उपस्थित असल्यास त्याबाबत चे CCTV फुटेजची सी.डी.मला माहिती साठी मिळावी,तसेच वीज वितरण कंपनीचे वाहन कायम कार्यालय समोर उभे असते परंतु लॉकबुक वरून गाडी कायम वापरात असल्याचे दिसते. तरी संबंधीतांना लेखी सुचना देण्यात याव्यात अन्यया मला नाईलाजास्तव आपले कार्यासमोर उपोषण करण्यासाठी परवानगी द्यावी असे नमूद केले आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव,वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले आहेत तरी संबंधित अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण नशिराबाद ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.
