नशिराबाद येथील गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी लंपास

0
3

जळगाव, प्रतिनिधी । नशिराबाद येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश लिलाधर झोपे (वय ६३, रा. नशिराबाद) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते सेवानिवृत्त असून गुरांसह शेतीचा व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या दोन म्हशी गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात बांधलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आला.

याबाबत सुरेश झोपे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here