जळगाव : शहरातील नवीन बी. जे. मार्केट मेकॅनिकल असोसिएशनतर्फे तेथील 20 दुचाकी मेकॅनिकलना काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते डस्टबिन व झाडू वाटप करण्यात आले. संबंधित ठिकाणी दिवसभर मेकॅनिकलकडून दुचाकी वाहनांची दुरुस्ती व त्यांच्यात नव्याने स्पेअरपार्ट बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात असल्याने प्लास्टिक कचरा तसेच इतर घाण विखुरलेल्या स्वरूपात साचत असते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित दुचाकी मेकॅनिकलना काल सकारात्मक भावनेतून डस्टबिन व झाडू वाटप करण्यात येऊन त्यांना दिवसभरातील सर्व कचरा व घाण त्यात टाकून त्याची घंटागाडीच्या माध्यमातून दररोज विल्हेवाट लावली जावी. जेणे करून हा मार्केट परिसर अतिशय स्वच्छ व दुर्गंधीमुक्त राहील. यावेळी मेकॅनिकल असोसिएशनचे पदाधिकारी श्री.दत्तू सोनार, श्री. सचिन जोशी, श्री.दस्तगीर पिंजारी, श्री.आबिद बागवान, श्री.इम्रान पटेल, श्री.अन्सार सय्यद व श्री.बंटी आगळे आदींसह मार्केटमधील गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
