नववर्षाच्या पुर्वसंध्येला ‘दारु नको दुध प्या’

0
42

जळगाव ः प्रतिनिधी
नववर्षाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात दारु आदी व्यसनांचे सेवन केले जाते. कुठलेही व्यसन घातकच असते यासाठी जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र व मुक्ती फाऊंडेशनतर्फे नववर्षाच्या पुर्वसंध्येला ‘दारु नको दुध प्या’ उपक्रम राबवत जनजागृती करण्यात येणार आहे.
वाढती व्यसनाधीनता व कोरोना विषाणुच्या विळख्यामुळे सारा समाज हैराण झाला असतांनाच नववर्ष स्वागताला (३१ डिसेंबर) मोठ्या प्रमाणात दारु, तंबाखु, गुटखा, बिडी, सिगारेट, गांजा, भांग आदी व्यसनाचे सेवन केले जाते. कुव्यसन कुठलेही असो ते घातकच ठरते व शेवटही अतिशय वाईट होते. व्यसनाचे प्रमाण नेस्तानाबूत व्हावे या करीता जीवनज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्रातर्फे संस्थेच्या आवारात दि. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एम.पी. पोटे यांच्यासह मान्यवरांच्या खास उपस्थितीत व्यसनमुक्ती जनजागृती व दारू नको दुध प्या या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी ही संस्थेतर्फे असे समाजपयोगी उपक्रम झाले आहेत. सहभागाचे आवाहन जीवनज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कुमावत मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी, वेसनील प्लसचे डॉ. प्रितम कुमावत, जीवनज्योतीचे मार्गदर्शन डॉ. शशीकांत गाजरे, डॉ.एस.जी. बडगुजर, डॉ. हर्षल बारी आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here