जळगाव : प्रतिनिधी I महापालिकेच्या नगररचना विभागातील गैरकारभाराबाबत आरोप केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नगररचना विभागात सर्व पारदर्शक कारभार सुरु असल्याचे सांगितले होते. मात्र, नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात दलाली सुरु आहे का नाही. याबाबतची सर्व चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी समिती गठीत करून दुध का दुध पाणी का पानी करावे असे आव्हान शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
समिती गठीत करण्याच्या मागणीसाठी प्रशांत नाईक यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत माहितीच्या अधिकाराखाली अनेकळवेळा पत्रव्यवहार करून मनपा नगररचना विभागातील किती फाईली प्रलंबित आहेत. तसेच लोकशाही दिनातील याबाबत प्रशासनाने उत्तर दिलेले नाही.
तसेच या प्रकरणी केलेल्या आरोपात व समितीच्या अहवालात काही त्रुटी आढळून आल्यास मनपा प्रशासनाने माझ्यावर दंडात्मक कारवाई करावी असेही आव्हान प्रशासनाला नाईक दिले आहे.
निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी मनपाने समिती गठित करावी
यासंपूर्ण प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी मनपा प्रशासनाने समिती गठीत करण्याची गरज असून यामध्ये सर्वच राजकीय पक्षातील प्रत्येकी एका राजकीय पक्षातील प्रत्येकी एका पदाधिकाऱ्यांची, बांधकाम व्यावसायिक एक वास्तुविशारद, प्रसारमाध्यमातील एक सदस्य अशांची समिती गठित करण्याची मागणी केली आहे. तसेच या समितीने चौकशी करून सर्व प्रकरण जनतेसमोर मांडावे, असे आव्हान प्रशांत नाईक यांनी मनपा प्रशासनाला दिले आहे.