धुळे, प्रतिनिधी । जिल्ह्यातील नगाव गावात, तरुणानी दिवाळीसंदर्भात एक नवीन उपक्रम राबवला, कारण या देशांमध्ये महापुरुषांनी एवढा मोठ स्वराज्य निर्माण करून ठेवले आहे अशा महापुरुषांना दिवाळीचा दिवशी पहिला दिवा लावला. त्यानंतर महाराजांच्या चरणी दिवा लावून अगरबत्ती पेटवून पूजन केलं त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी दुसरा दिवा एक एक दिवा आपल्या दारासमोर लावा असा हा उपक्रम गावातील काही तरुणांनी राबवीण्याचे ठरवले. नंतर प्रत्येकाने आपापल्या दारासमोर दिवा लावला.
पुर्ण गाव रात्रीच्या काळोख्या अंधारात लखलखीत प्रकाश तेजमय चमकत होते व गावातील शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी जाऊन महाराजांच्या पुतळ्याचे स्वच्छ पाण्याने स्नान करून पुतळा स्वच्छ करून शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून गावातील कार्यकर्ते इतर मंडळी यांना घेऊन टाळ्या वाजवून प्रत्येकाने शिवाजीमहाराजांना त्रिवार वंदन करून आणि दिवाळी निमित्ताने फटाके फोडून मोठ्या आनंदाने उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात आली.
तसेच गावातील तरुण तडफदार मंडळी दीपक खैरनार, अरुण पाटील, दुर्योधन पाटील, संदीप पाटील, गोपाल पाटील, लखन पाटील, मोहन वाघ, बन्सीलाल प्रफुल्ल पाटील, जीवन मिस्तरी, छोटू मिस्तरी, छोटू खैरनार, भुषण पाटील, उदय खैरनार, मंगेश पवार, सागर पवार आदी बरेच गावातील मंडळी शिवप्रेमी उपस्थित होते. आणि येणाऱ्या पुढच्या दिवाळीला असा उपक्रम राबवून प्रत्येक गावागावात गाव दीपमया ,प्रकाश मय ,तेजमय कसा साजरा करण्यात येईल या संदर्भात चर्चा केली असा उपक्रम राबविण्यात यावा. या संकल्पनेने या गावाच्या तरुणांनी एक उत्कृष्ट जनजागृती करण्यात आली. प्रत्येक गावात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पहिला दिवा लावायचा आणि मग दुसरा दिवा प्रत्येकाने आपल्या दारासमोर लावावा असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातला नवीन संकल्प केला. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन केलं.
