धार्मिक : हिंदू व भारतीय असल्याचा मला गर्व- ना. गुलाबराव पाटील

0
69

फैजपूर, प्रतिनिधी । अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या येथील खंडोबा मंदिर देवस्थानात राज्य शासनाच्या तीर्थ-क्षेत्र निधीतून सुमारे ४० लक्ष खर्चाचे संत निवास व जलकुंभचे भूमिपूजन सोहळा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते आ. शिरिष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हिंदू व भारतीय असल्याचा मला गर्व आहे. प्रत्येकानेच आपल्या धर्माचा व देशाचा अभिमान बाळगला पाहिजे असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता हे साधन आहे त्याचा सदुपयोग करून लोकहिताची कामे केली पाहिजे. आपल्या धार्मिक, आध्यात्मिक संस्कृतीमुळे माणसाला आचरणाचा धाक आहे अन्यथा हा धाक संपुष्टात आल्यास देश सुध्दा संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. वटवृक्ष हा विशाल महाकाय वाढतो मात्र त्याच्या पारंब्या या पुन्हा जमिनीवर येतात. याचे उदाहरण देत मनुष्याने किती मोठे झाल्यावर ही सदाचाराने विनम्र राहण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी उपस्थितांना दिला. धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी संत महंतांच्या हाकेला मी व माझे शासन सदैव साथ देईल असे आश्वासित केले.

यावेळी प्रथमतः खंडोबा भगवानचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन व माल्यार्पण करून नतमस्तक झाले. तदनंतर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यानंतर महंत घनश्याम दासजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संत महंत व मंत्री महोदय मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
खंडोबा देवस्थानाच्या वतीने गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी शाल, श्रीफळ, पुष्पमाला पुष्पगुच्छ देऊन संत महंत मंत्री महोदय यांचे स्वागत सत्कार केला.
अध्यक्षीय मनोगतात आ. शिरिष दादा चौधरी म्हणाले की, नामदार गुलाबराव पाटील व माझ्या प्रयत्नांनी देवस्थान विकासासाठी निधी प्राप्त करून कामाचा शुभारंभ झाला आहे. अजून यापुढे बराच विकासाचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी संत महंत च्या हाकेला नेहमीच साथ देणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगतात गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी आतापर्यंत देवस्थानाच्या विकास कार्याचा उवापोहा मांडत मंत्री महोदय, आमदार महोदय यांनी पुढील विकासासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी सभा मंचावर महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज, शास्त्री भक्तीकिशोर दासजी महाराज, गजानन महाराज, रामदास नागोजी महाराज, राम मनोहर दासजी महाराज, कन्हैया महाराज, हभप प्रवीणदास महाराज, ना. गुलाबराव पाटील शिरिष दादा चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रंजना ताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील, यावल सभापती पल्लवी ताई चौधरी, जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, मसाका चेअरमन शरददादा महाजन, फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक, नायब तहसीलदार आर. के. पवार, शिवसेना तालुकाप्रमुख सौ. रजनी उदय चौधरी, सभा मंचावर उपस्थित होती.
या कार्यक्रमाला जिल्हाभरासह भुसावळ येथील नगराध्यक्ष प्रमोदभाऊ नेमाडे, युवा सरपंच अंकिता पाटील, माजी सभापती भरत भाऊ महाजन, जिल्हा दुध संचालक हेमराज चौधरी, नपा विरोधी गटनेते शेख कुर्बान, नपा काँग्रेस गटनेते कलीम खान मणियार, केतन किरंगे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक विजयसिंह परदेशी, शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक अमोल निंबाळे, तालुका उपप्रमुख राजू काठोके, माजी नगरसेवक अप्पा चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुजारी राम मनोहर दासजी महाराज, पवन यादव, चंद्रकांत भिरुड, संजय सराफ, चोलदास पाटील, सुनील कोळी, बाळू नारखेडे, वैभव अण्णा नारखेडे, विनोद परदेशी, संजय रल, हर्षल वायकोळे, जितेंद्र वायकोळे, अमित (विक्की) जयस्वाल यांनी अथक परिश्रम घेतले. महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय गणेश गुरव सर यांनी दिला तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रुपाली चौधरी व धनगर सर यांनी केले. आभार माजी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here