प्रतिनिधी l धानोरा
चर्मकार सामाजाने प्रत्यक्ष शैक्षणिक चळवळीत समाजकारण करावे,सद्यस्थितीत वेळ व काळ हा अनुकूल असल्याने त्याचा फायदा हा घेतला पाहीजे,शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवला पाहीजे,उच्च शिक्षणाची कास अंगीकारली पाहीजे,सोबतच व्यावसायिक शिक्षणातुन व्यवसाय थाटला पाहीजे,आपल्याला मिळालेला सवलतीचा फायदा घेऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले पाहीजे.यामुळे आपला कौंटूबिक तसेच समाजाचा अधिकच विकास होईल असे प्रतिपादन डॉ बी आर आंबेडकर मोफत अभ्यासिका चे संचालक प्रशांत सोनवणे यांनी आयोजित कार्यक्रमात केले.तसेच सर्व प्रकारच्या पोलिस भरती,सैनिक भरतीसाठी मार्गदर्शन मी स्वतः देईल असेही सांगितले.
येथिल चर्मकार वाड्यात संत रोहीदास यांची जयंतीउत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संत रोहीदास यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी सुरेश सोनवणे,भास्कर सोनवणे,लक्ष्मण सोनवणे,परशुराम सोनवणे,देविदास सोनवणे,देवराम सोनवणे,चंद्रकांत सोनवणे,दिलीप सोनवणे,शांताराम सोनवणे,लोटन सोनवणे,अनिल निंभोरे,रमेश सावकारे,किशोर वानखेडे,राजु सोनवणे,संजय सोनवणे,चेतन सोनवणे,महीला तसेच परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचलन लोटन सोनवणे आभार गोपाळ सोनवणे यांनी केले.विकास सोनवणे यांनी संत रोहीदास यांच्या जीवनकार्याचा परीचय करुन दिला.
**दलित वस्तीतुन होणार वाड्याचा विकास उपेक्षितच**
गेल्या दोन वर्षापासुन ग्रामपंचायत मधुन सुशोभिकरण प्रस्तावित आहे.तसेच अद्ययावत व्यवस्था तसेच मुंजोबा ओट्याला सुशोभिकरण,घरकुल योजना,विविध योजना अंतर्गत दलित वस्ती चा लवकरच विकास करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.पण नविन पदाधिकारी यांनी देखिल निराशा केलेली आहे.तरी आपल्या हक्कासाठी लवकर ग्रामपंचायत मधुन निधी उपलब्ध करुन देण्याची माहीती सरपंच सुनिता कोळी यांनी दिली.