धानोरा ता. चोपडा, वार्ताहर । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दि २९ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली.यावेळी वशीला सुरु असल्याचे सांगत गावातील,परीसरातील ग्रामस्थ यांनी सांगितले.तर नाव नोंदणी साठी एकच टेबल असल्याने नोंदणी करण्यास उशीर लागत होता.
येथिल स्थानिक कर्मचारी आपल्या मर्जीतील लोकांची नोंदणी अगोदरच ठेवत आहेत.यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.दुसरीकडे दोन वैद्यकिय अधिकारी असुनही येथे लस साठी नियोजन केले जात नसल्याने समस्या अधिक वाढत आहेत.लशींचा पुरवठा व्यवस्थितपणे होत आहे पण येथे लस उपलब्ध असुनही नियोजनशुन्य कामामुळे आलेल्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.काही महीला रोजंदारी थांबवून लस साठी पूर्ण दिवस ताटकळत बसत आहेत.यावेळी खामखेडा बोआ,ज्ञानेश्वर सोनवणे,रवि पाटील यांनी समस्यांचा पाढा वाचला.
विशेष म्हणजे या ठिकाणी गावातील फुकटची पुढारकी करणारे कार्यकर्ते जास्त लक्ष घालत असुन काल आधार कार्ड जमा केलेल्या ग्रामस्थाना आज परत नवीन आधारकार्डच्या झेरॉक्स आणायला लावल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.