धानोऱ्यात चक्क एटीएम मशीनच चोरीला, यापुर्वी तीनदा झाला होता चोरीचा प्रयत्न

0
15
धानोऱ्यात चक्क एटीएम मशीनच चोरीला, यापुर्वी तीनदा झाला होता चोरीचा प्रयत्न

धानोरा ता. चोपडा (वार्ताहर ) । येथील जळगाव रोडा लगत असलेल्या ग्रा.प. शॉपींग सेंटरमधील इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीनच थेट आज मध्यं रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ धानोरा सह परिसरात माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की धानोरा गावाबाहेरील जळगाव रत्यांवरील ग्रा.प. मालकीच्या शॉपींग सेंटरमध्ये इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीन अनेक वर्षांपासून आहे, दरम्यान काल रात्री दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन फुटत नसल्याने थेटे ट्रकमध्ये ठेवत चोरुन नेले. या पुर्वी तीनदा हे मशीन फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. रात्री हे मशीन चोरट्यांनी चोरून एका बारा चाकी ट्रॅक क्र. एमएच 20 8559

मध्ये ठेवत असल्याचे येथील सदगुरु ऑईस्क्रीम दुकानाबाहेर लावलेल्या सीसी टिव्ही फुटेजमध्ये दिसुन आले आहे. धानोरा विदयालयाबाहेरील लावलेल्या सीसी टिव्ही कॅमेरामध्ये रेकॉडींग रिचार्ज नसल्याने मुळे होत नाही, अशी माहीती यावेळी मिळाली.

‘दरम्यान दोन वर्षापुर्वी देखील धानोर यात चार अज्ञात चोरट्यानी सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून तीन लाख च्या वरती रक्कम लुटून नेली होती , त्या घटनेचा अध्यापही थांगपत्ता नाही. घटनास्थळी अडावद पोलिस स्टेशनचे स. पो.नि. किरण दांडगे, उपनिरिक्षक पाटील, बीट हवालदार सुनिल तायडे, कादीर शेख आदींनी भेट देऊन पाहणी केली. घटनेच्या दुष्टीने तपास सुरू केल्याची माहिती सपोनि किरण दांडगे यांनी साईमतशी बोलतांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here