धानोर्‍यात २६ दिवसांत ७४ पॉझिटिव्ह रुग्ण, सहा मृत्यू

0
17

धानोरा, ता. चोपडा ः प्रशांत चौधरी
धानोरा येथे १३ हजार लोकवस्तीच्या गावात एप्रिल महिन्यात तब्बल ७४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सर्वच स्तर अपयशी ठरले आहे. केंद्रात अजूनही पिण्याच्या पाणीची सोय नसून वॉटर कुलर अजुनही नादुरुस्त आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी भेटी देऊनही सुधारणा नसल्याने रुग्णांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.
गेल्या वर्षी गावाने चांगला लढा देत कोरोना संक्रमण चांगले रोखून धरले होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत धानोरासह परिसरात गेल्या २६ दिवसात १०२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात तब्बल १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या १८ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी, होम क्वॉरंटाईनने उपचार सुरु आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असून सुसज्ज अशी यंत्रणा असूनही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखू शकले नाही. यात ग्रामपंचायत कडूनही कुठलीही ठोस उपाययोजना झालेली नाहीत. यामुळे संक्रमण सुरुच आहे.
गावातील मुख्य चौकात भाजीपाला विक्रेते बसतात. याच ठिकाणी किराणा दुकाने, मेडीकल, दवाखाने आहेत. यामुळे सकाळपासूनच गर्दी होत असते. दुसरीकडे गावात एवढे रुग्ण सापडूनही एकही ठिकाणी कंटेन्मेंट झोन लावले गेले नाही. जनजागृती केली गेली नाही. ग्रामस्थांचा घोडका दिवसभर सुरुच असतो. बसस्थानक परिसरात सकाळ, संध्याकाळी गर्दी होत असते. यामुळे संक्रमण थांबले गेले नाही.
१५०६ जणांनी केले लसिकरण
कोरोना संक्रमण पासून रोखण्यासाठी पहिली लस १३९३ तर दुसरी लस ११३ जणांनी टोचून घेतली. यात मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राने चांगली सुविधा देत लसिकरणात कुठलाही खंड पाडला नाही.
एका जारवर भागवली जाते पाण्याची तहान
येथील आरोग्य केंद्रात वॉटर कुलर नादुरुस्त आहे. बाहेर असलेली सुसज्ज पाण्याची टाकी बंद अवस्थेत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले हे पाण्याचा एक जार रुग्णांसाठी, कर्मचार्‍यांसाठी मागवतात. यामुळे पाण्याची तहान फक्त एका जारवर भागवली जात असल्याचे चित्र येथे दिसते.
तपासणी नियमित सुरु आहे. गावागावात कॅम्प लावून तपासणी, जनजागृती केली जात आहे. संशयित रुग्ण काही दिवस अंगावर काढून आमच्याकडे येतात तरी उपचार, लसिकरण व्यवस्थितपणे सुरु आहे.पाण्याचीही समस्या लवकर सोडवू.
डॉ.उमेश कवडीवाले
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, धानोरा
सध्या नियमितपणे ऍटीजेन, आरटीपिसीआर तपासणी केल्या जातात. पण, आरटिपीसीआर तपासणीचा रिपोर्ट हा आठवडाभर येतच नाही. यामुळे रुग्ण दगावले जात आहेत.
गजानन कोळी
ग्रामपंचायत सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here