धानोरा विद्यालयाचे जिल्हास्तरीय मतदार सप्ताह विविध स्पर्धेत यश

0
32
             धानोरा तालुका चोपडा – भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व क्रीडा विभाग अंतर्गत १५ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना प्रत्येक विद्यालयात केली होती.राष्ट्रिय मतदार सप्ताह अंतर्गत मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात व तालुका स्तरावर तहसिलदार अनिल गावित यांनी विविध स्पर्धा अंतर्गत निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व आभासी पडद्यावर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यांत आले होते.या स्पर्धेत धानोरा येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटिल ज्युनिअर काँलेजातील इयत्ता ९ वीची विद्यार्थीनी कु.मैथलि अनिल साळुंके हिने जिल्हातुन घोषवाक्य स्पर्धेत प्रथम पटकविला तर तालुका स्तरीय राष्ट्रीय मतदार सप्ताहानिमित्त विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत घवघवीत यश संपादन केले.निबंध स्पर्धेत लोकेश किशोर महाजन(प्रथम), चित्रकला स्पर्धेत चैताली योगेश सोनवणे (प्रथम), घोषवाक्य स्पर्धेत हर्षला देविदास सोनवणे (प्रथम),रांगोळी स्पर्धेत धनश्री प्रमोद पाटील (प्रथम), वकृत्व स्पर्धेत धनश्री  प्रमोद पाटील(प्रथम),सिद्धेश  विजय चाैधरी(दुसरा),कु.स्नेहा अनिल पाटिल(दुसरी),स्नेहल शामकांत देवरे(दुसरी) या विजयी स्पर्धकांना विद्यालयात राष्ट्रिय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी तहसिलदार अनिल गावित यांच्याकडून प्रमाणपत्र व शालेय उपयोगी वस्तु भेट देवुन गाैरव करण्यांत आला.या यशस्वी विद्यार्थांना निवडणुक नोडल अधिकारी प्रा.मिलिद बडगुजर व वासुदेव महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
         या  कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य बाजीराव पाटिल होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन शालेय समिती सदस्य वामनराव महाजन,प्रदिप महाजन,प्राचार्य के.एन.जमादार,पर्यवेक्षक के.पी.बडगुजर, जेष्ठ शिक्षक एस.पी.महाजन,नवल महाजन, प्रा.एस.सी.पाटील,प्रा.रेखा महाजन,साै.पुनम पाटील,प्रा.संजय बडगुजर, एस.डि.सोनवणे, एस.एच.तडवी, सी.आर.चाैधरी,एस.एस.कोळी,दिपेश बडगुजर,सुमित सुलताने,लिपिक योगेश पाटील,सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवडणुक नोडल अधिकारी वासुदेव महाजन यांनी तर आभार निवडणुक नोडल अधिकारी प्रा.मिलिंद बडगुजर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here