Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धानोरा»धानोरा ग्रा.पं.वर पुन्हा शिवसेनेची सत्ता कायम
    धानोरा

    धानोरा ग्रा.पं.वर पुन्हा शिवसेनेची सत्ता कायम

    saimat teamBy saimat teamFebruary 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धानोरा, ता. चोपडा ः वार्ताहर
    धानोरा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली असून सरपंचपदी शिवसेनेच्या सुनिता संतोष कोळी तर उपसरपंचपदी विजय चौधरी ांची निवड करण्यात आली.
    सुनिता संतोष कोळी यांनी गजानन कोळी यांचा पराभव केला. सुनिता कोळी यांना ९ तर गजानन कोळी यांना ८ मते मिळाली. उपसरपंच विजय चौधरी यांना ही ९ मते मिळाली. त्यांनी सावंत महाजन यांचा पराभव केला. सरपंचपद एस.टी.जनरल निघाल्याने पाच उमेदवार दावेदार होते. तत्पुर्वी सरपंच पदासाठी सुनिता कोळी, रज्जाक तडवी, गजानन कोळी यांनी अर्ज दाखल केले होते. रज्जाक तडवी यांनी माघार घेतली. उपसरपंचपदी विजय चौधरी व सावंत महाजन यांचा प्रत्येकी एक अर्ज आला होता. सरपंच व उपसरपंच यांची गुप्त मतदानाद्वारे निवड करण्यात आली. पिठासिन अधिकारी शिवाजी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना मदत म्हणून ग्रामसेविका एस.बी.पाडवी, कोतवाल तानाजी महाले यांनी मदत केली.
    याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य माणिकचंद महाजन, मेघा चौधरी, मेघा पाटील, अनिता कोळी, कमल पाटील, पंढरीनाथ कुंभार, गजानन कोळी, सावंत महाजन, रज्जाक तडवी, शितल महाजन, लिला महाजन, ममता पाटील, मुक्तार कादर, रविंद्र शिरसाठ उपस्थित होते. यावेळी अडावद पोलिस ठाण्याकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट हवालदार जगदीश कोळंबे, मुख्यालयातील दहा कर्मचारी, पोलिस पाटील दिनेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.