धरणगाव, प्रतिनिधी । शहरातील रमाई घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा असे आश्वासन देवून सुध्दा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने मनसेने आज एक दिवशीय आंदोलन तहसील कार्यालयाजवळ केले.
रस्ते साधन सुविधा व अस्थापणा यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव येथे रमाई घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा असे आश्वासन देवून सुध्दा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात आले. म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दिवसीय आंदोलन करून संबंधित कामचुकार अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज 27 सोमवारी सकाळी 11:30 वाजता धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन व जाहीर निषेध करण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.