धरणगाव येथे धान्य गोडाऊनवर विशेष पोलिस महानिरीक्षकांची धाड

0
14
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । धरणगाव येथे धान्य गोडाऊनला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी व त्यांच्या नवीन पोलीस पथकाने धाड टाकली. पण ते धान्य रेशनचे आहे की खासगी आणि रेशनचे असेल तर नियमाप्रमाणे साठा आहे की नाही हे ठरविण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिला. त्यामुळे गोदामाला सील करून ठेवण्यात आले आहे.

शहरातील कमल जिनिंगमध्ये धान्याचा अवैध साठा करून ठेवला आहे, अशी माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने त्या जिनिंगमध्ये छापा टाकला; पण ते धान्य रेशनचे आहे की खासगी आणि रेशनचे असेल तर नियमाप्रमाणे साठा आहे की नाही हे ठरविण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिला. त्यामुळे गोदामाला सील करून ठेवण्यात आले आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी आधी कळवायचे की नंतर, हा प्रतिष्ठेचा मुद्दा झाल्यामुळेच पोलिसांची ही कारवाई अधांतरी राहिली, असे चित्र यातून निर्माण झाले आहे.
धरणगावच्या कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली होती.

यासंदर्भात कमल जिनिंगचे संचालक दिलीप मराठे यांनी सांगितले की, जिनिंगची जागा रितसर भाडेकराराने परवानाधारक व्यापारी नीलेश वाणी यांना दिली आहे. त्यामुळे कुठलाही अवैध धान्यसाठा असण्याचा प्रश्नच येत नाही. व्यापारी वाणी हे मार्केटमधून धान्य खरेदी करून कमल जिनिंगच्या गोदामात ठेवत असल्याचे मराठे यांनी सांगितले.

पोलिसांनी कारवाई केलेली असल्यामुळे त्यांनीच एफआयआर दाखल करावी. संशयित धान्य रेशनचे असल्याबाबत तहसीलदारांना तपासणी करण्याबाबत कळवावे. धान्याबाबत तहसीलदारांनी तपासणी केल्यानंतर पोलिसांना अहवाल सादर केला जाईल. त्यानुसार पुढील कारवाई करावी. सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here