धरणगांव प्रतिनिधी – येथे दि. २२ सप्टेंबर, २०२१ बुधवारी वसंतराव भोलाणे यांचा ६४ वा जन्मदिनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन पी आर हायस्कूल येथे करण्यात आलेले होते.
सविस्तर वृत्त असे की, शिबीराचे उद्घाटन बापूसाहेबांचे आई- वडील सौ. व श्री. वैजंताबाई – शिवदास गरबड भोलाणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यानंतर विचार मंचावर अभिष्टचिंतन समारोह कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी जागृत जनमंचचे शिवराम पाटील व तेली समाजाचे के डी चौधरी यांनी सत्कारमूर्ती ऍड. व्ही एस भोलाणे यांच्याविषयी गौरवोद्गार केले. तसेच, भाजपचे नेते सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, कन्हैया रायपुरकर, शिवदास भोलाणे, अरविंद देवरे, पी.डी.पाटील सर, लक्ष्मण पाटील सर, जितेंद्र महाजन यांनी सत्कार करून बापूसाहेबांच्या कार्याविषयी मत मांडले.
आरोग्य शिबिरात 2 डी इको, हृदयरोग, मधुमेह , रक्तदाब, ECG कार्डिओग्राम, मेडिसीन, मोतीबिंदू आदी तपासण्या करण्यात आल्या. वरील सर्व तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर व स्टॉप उपलब्ध होते. यामध्ये डॉ. सुशील (हृदय रोग विभाग), डॉ. शुभम भोलाने (मेडिसिन विभाग ), डॉ.अमोल (मोतीबिंदू विभाग), डॉ. अभिजीत (शास्रक्रीया विभाग), डॉ.ऋतुजा (स्त्रीरोग विभाग), डॉ. प्रमोद (ऑर्थो विभाग), डॉ.मापारा (ऑर्थो विभाग) यांचा समावेश होता. तपासणी नंतर गोदावरी फाउंडेशन येथे उपचार व निदान पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. शहरातील २८५ नागरीक बंधू – भगिनींनी मोफत महाआरोग्य शिबीराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिरास विशेष सहकार्य डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांचे लाभले.
या भव्य महाआरोग्य शिबिराला तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष के.डी.चौधरी, महामंडलेश्वर भगवान महाराज, देवकांत चौधरी, आप्पाराव चौधरी, राष्ट्रवादीचे मोहन पाटील, काँग्रेसचे डी.जी.पाटील, डॉ मिलिंद डहाळे, माजी नगरसेविका डॉ. पद्मिनी डहाळे, सौ.चंद्रकला भोलाणे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्राचे प्रांताचे प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील, मारुतीराव कल्याणकर, तसेच काबरा, मेड डिव्हिजन संघटन प्रांत संयोजक डॉ.शुभम भोलाणे, आर्यन सैंदाणे, भाजपचे संजय महाजन, जिजाबराव पाटील, दिलीप महाजन, साहित्यीक डॉ. संजीव कुमार सोनवणे, शिरीष बयस, धिरेंद्र पुर्भे, आधार चौधरी, जीवन पाटील सर,काँग्रेसचे रतिलाल चौधरी, सुभाष पाटील, सम्राट परीहार, महेश पवार, दिनेश कंखरे, छोटू जाधव, डॉ. प्रशांत भावे, अँड.महेंद्र चौधरी, राहुल पारेख, इजराइल, आबा चौधरी नंदुरबार, जेष्ठ पत्रकार कडूजी महाजन, धर्मराज मोरे, डी एस पाटील, जितेंद्र महाजन, विनोद रोकडे, कल्पेश महाजन, बाळासाहेब जाधव, हर्षल चौहान, योगेश पाटील, आबासाहेब वाघ आदी मान्यवरांनी शुभेच्छापर भेटी दिल्यात. श्री.व सौ.भोलाणे व डॉ. शुभम भोलाणे यांचे शहर व परिसरात सामाजिक उपक्रम संदर्भात कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वाय जी पाटील यांनी तर आभार सत्कारमूर्ती ऍड. व्ही एस भोलाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेकानंद नागरी पतपेढीचे शाखाधिकारी वासुदेव महाजन, दत्तात्रय चौधरी तसेच जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयाचे विलास चौधरी, एन एस चौधरी, विकास शिरसाठ, मुख्याध्यापक प्रशांत नेमाडे, सपकाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.