धरणगाव ः जिल्हा प्रतिनिधी
कोरोना चे दुसर्या लाटीचा प्रतिकार करण्यासाठी सर्वच स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत कोरोना युद्धाच्या लढाईत शासन, प्रशासन, राजकीय, सामाजिक संघटना व समाजसेवक मंडळी अहोरात्र लढून संघर्ष करीत असताना धरणगाव शहर व तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघटनेचे योगदान असावे या भावनेतून शिक्षक बांधवांनी आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला आठ जंबो ऑक्सीजन सिलेंडर किट सहित भेट देण्यात आले
शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांनी केलेल्या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला साधारण दीड लाख रुपये शिक्षक वर्गणी जमा झाली. यातून आठ जंबो ऑक्सिजन सिलेंडर घेण्यात आले ऑक्सीजन अभावी रुग्ण दगावायला नको यासाठी शिक्षकांनी हा लहानसा प्रयत्न केलेला आहे. सर्व सिलेंडर आज ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोवीड रूग्णांचा सेवेसाठी डॉ सुनील बंसी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या वेळी प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, डॉ सुनील बंसी, ना.तहसीलदार प्रथमेश मोहोळ, डॉ. चंद्रकांत पाटील,माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सी.के.पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस. पाटील, टी.डी.एफ.संघटनेचे अध्यक्ष डी.एस.पाटील, उपाध्यक्ष पी.डी.पाटील, कैलास माळी, सुनील देशमुख, अनिल सूर्यवंशी, पर्यवेक्षक ए.एस.पाटील, कल्पेश महाजन, एच.डी.माळी, तुषार नाईक, नारायण वाणी, यु.एस.बोरसे, डी.के.चौधरी, अनिल पाटील,बोरगाव विद्यालयाचे व्ही.टी. पाटील,डी एन पाटील,मोहन नाना पाटील,श्री देवरे सर सोनवद, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाला तालुका मुख्याध्यापक संघ, ता. माध्यमिक शिक्षक संघ, ता. टी.डी.एफ. शिक्षक संघ, कनिष्ठ महाविद्यालयीन संघ, खाजगी प्रा.शिक्षक संघ, ता. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू – भगिनींचे सहकार्य लाभले.
येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तील शिक्षकांनी एकरकमी ५१ हजार ५०० रुपये मदत निधी दिलेला आहे यामुळे या विद्यालयाच्या प्राचार्य सौ सुरेखा पाटील,आणि शिक्षकांचे कौतुक होत आहे तसेच बालकवी व सारजाई कुडे विद्यालय,पी आर हायस्कूल, महात्मा फुले , साळवे इंग्रजी विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, बोरगाव विद्यालय या शाळांचा देखील मोठा हातभार आहे. काही कोरोना ग्रस्त शिक्षकांनी देखील मदत केलेली असून त्यांची ही मदत निश्चिती मोलाची ठरणार आहे.
तालुक्यातील शिक्षकांनी संघटनेच्या आव्हाहन ला दिलेल्या प्रतिसादातून आठ जंबो सिलेंडर देता आले यातून किमान काही रुग्णांचा जीव ऑक्सिजन अभावी जाणार नाही हे मोठे समाधान असणार आहे बालकवी चे जन्मभूमी त आणि साने गुरुजींच्या कर्मभूमी. चे सानिध्यात असल्याने नेहमीच सामाजिक कार्याची ऊर्जा मिळत असते आमच्या काही शिक्षक शिक्षकेतर बांधव देखील कोरोणा मुळे आम्हाला सोडून गेले आहेत आमच्या या उपक्रमातून कुणाचा जीव वाचला तर तिच खरी श्रद्धांजली आमच्या बांधवांना असेल अशा भावना संघटनेचे प्रतींधिनी नी व्यक्त केल्या. यावेळी प्रशासनाने शिक्षकांचे आभार व्यक्त केले. शिक्षक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करतात शिक्षकांवर समाजाचा विश्वास आहे त्यामुळे शिक्षकांनी हाती घेतलेले कार्य निश्चितच फलदायी असते तालुक्यातील शिक्षकांनी केलेली ही मदत निश्चितच प्रेरणादायी असणार आहे.असा भावना प्रशासनाने व्यक्त केल्या.