जळगाव : जिल्हा प्रतिनिधी
धरणगाव शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. यासर्व परिस्थितीवर कालच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील आणि रविंद्र कंखरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली होती.रात्री जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी अचानक धरणगाव ग्रामिण रुग्णालयाला भेट देवून पहाणी केली. याप्रसंगी रविंद्र कंखरे यांच्यासह पालिकेतील सेनेचे गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, राहुल रोकडे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल रात्री अचानक येथील ग्रामिण रुग्णालयाला भेट देवून पहाणी केली. येथील औषधी साठा व कर्मचार्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकार्यांच्या या भेटीला पालकमंत्र्यांचे समर्थक रविंद्र कंखरे यांची काल झालेल्या भेटीची पार्श्वभूमी होती. जिल्हाधिकारी ग्रामिण रुग्णालयात आले तेव्हा रविंद्र कखंरे, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे व भानुदास विसावे हे उपस्थित होते. रुग्णालयासाठी एक डॉक्टर आवश्यक असून रुग्णांच्या नातेवाईकांना नियंत्रीत करण्यासाठी येथे एक पोलीस आणि एक होमगार्डची २४ तास नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे रविंद्र कंखरे यांनी जिल्हाधिकारी आणि शल्यचिकित्सक यांच्याकडे केली. सर्व परिस्थितीचा आढावा घेवून रविंद्र कंखरे यांनी केलेल्या मागणीचे गांभिर्य ओळखून शल्यचिकित्सकांनी तात्काळ डॉ. भंगाळे यांची प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.
तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी धरणगाव ग्रामिण रुग्णालयात २४/७ एक पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश धरणगाव पोलीसांना दिले. या प्रसंगी रविंद्र कंखरे यांनी प्रत्येक विषयावर मुद्देसुद मांडणी केल्यामुळे अधिकार्यांना परिस्थितीचे गंभीर समजून जागेवरच निर्णय घ्यावे लागल्याने उपस्थित रुग्णाच्या नातेवाईकांनी रविंद्र कंखरे यांचे कौतुक केले. धरणगावच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंजनी धरणातून आवर्तन सोडण्यासाठी सुध्दा रविंद्र कंखरे यांनी असाच पाठपुरावा केल्याची आठवण खुद्द जिल्हाधिकार्यांनी याप्रसंगी करुन दिल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकारी संवेदनशिल
धरणगावच्या समस्यांबाबत पालकमंत्री नेहमीच गंभीर असतात. कालच जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह आम्ही जिल्हाधिकार्यांची भेट घेतली होती. त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर त्यांनी हा तातडीने दौरा केला. जिल्हाधिकारी धरणगावबाबतीत अतिशय संवेदनशील असून पाणी अंजनीचे आवर्तन सोडण्यासाठी सुध्दा त्यांनी सहकार्य केले.
– रविंद्र कंखरे