धरणगाव ः प्रतिनिधी
येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष तथा पाटील समाजाचे उपाध्यक्ष दिलीप (बापू) जगन्नाथ पाटील यांनी शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
त्यांच्या प्रवेशाने लहान माळी वाडा परिसरात शिवसेनेला आगामी निवडणुकीत फायदा होईल. त्यांचा प्रवेशाने राज्याचे पाणीपुरवठा व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, सुरेश महाजन, नंदू पाटील, डॉ.विलास महाजन, गोलू चौधरी, पापा वाघरे, प्रशांत देशमुख, राजू चौधरी, वाल्मिक पाटील, ईश्वर चौधरी, रुपेश सोनार, वसीम पिंजारी, कमलेश बोरसे, तौसिफ पटेल, नाना चौधरी, छोटू चौधरी, रवी जाधव, दगडू चौधरी, गोलू चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.