धरणगावात पत्रकार दिन साजरा

0
11

धरणगाव, जिल्हा प्रतिनिधी I पत्रकार दिनानिमित्त धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने येथील शासकिय विश्राम गृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पहिले मराठी वृत्तपत्रकार व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण केले.

यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ॲड.वसंतराव भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारीत मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे सदस्य ॲड.वसंतराव भोलाने, लक्ष्मण माळी, कडू महाजन, धर्मराज मोरे, भगीरथ माळी, बी.आर.महाजन, जितेंद्र महाजन, आर.डी.महाजन, अविनाश बाविस्कर, बाळासाहेब प्रभूदास जाधव, सतीश शिंदे, विनोद रोकडे, योगेश पाटील, दिनेश पाटील, धनराज पाटील, लक्षमण पाटील, पी.डी. पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here