जळगाव, प्रतिनिधी । शहरामध्ये नोकरी निमित्त एक 28 वर्षीय तरुणी लग्नाच्या आमिषाने सरक पाच वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्या संशयित आरोपी विरुद्ध एमाडिसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी संपत लक्ष्मण मल्हाड रा. दरीबडची ता. जत, जि. सांगली हा तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष देत तसेच जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. सन २०१६ ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडलेल्या घटनेप्रकरणी तरुणीने सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून संपत मल्हाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. प्रमोद कठोरे हे करीत आहेत.
