धक्कादायक : महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबर मारहाण

0
13

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी येथे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्याची घटना घडली. डोक्यात कृषी अवजार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी गुरुवारी दुपारी १.३० वाजता सिंधी कॉलनीत गेले असता एका प्राैढाने त्यांना मारहाण केली. डोक्यात कृषी अवजार (टिकाव) मारण्याचा प्रयत्न झाला. संपूर्ण प्रकार पथकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. सहायक अभियंता जयेश रजनिकांत तिवारी यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्यानुसार, तिवारी हे दीक्षितवाडीतील पावर हाऊस येथे नोकरीस आहेत. गुरुवारी दुपारी ते कार्यालयीन सहायक योगेश जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे, तंत्रज्ञ मधुकर कांबळे व कंत्राटी कर्मचारी गणेश जगन्नाथ नन्नवरे यांच्यासोबत सिंधी कॉलनी परिसरात थकीत वीजबिल वसुली व सूचना करण्यासाठी गेले होते. या वेळी संंतोषी माता मंदिराजवळील टिकमदास परमानंद पोपटानी यांच्या नावाने असलेल्या वीजमीटरचे २४६० रुपये बिल गेल्या ७५ दिवसांपासून थकबाकी असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिवारी यांनी पोपटानी यांना आवाज देऊन बाहेर बोलावून वीजबिल भरण्याच्या सूचना केल्या. त्याचा राग आल्याने किशोर टिकमदास पोपटानी यांनी थेट पथकावर हल्ला चढवला. टिकाव उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. झटापट केली. त्यात योगेश जाधव यांच्या कानाला व सोनकांबळे यांच्या पाठीवर दुखापत झाली. दगड उचलून फेकून मारण्याचा प्रयत्न केला. परिसरातील लोकांनी पोपटानी यांना पकडून शांत केले.

याप्रकरणी तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपटानी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोपटानीला ताब्यात घेतले आहे. पोपटानी याने पथकावर हल्ला करताच भुवनेश पवार यांनी माबाइलमध्ये चित्रण केले आहे. त्यात पोपटानी हा टिकाव उगारून मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here