यावल ः प्रतिनिधी
शहरातील एका दुचाकी चोरट्याने मोटर सायकल चोरून त्याच मोटरसायकल मालकाशी संपर्क साधून तुमची मोटरसायकल कोणाकडे आहे, हे मला माहिती असून तुम्ही दोन हजार किंवा पाच हजार रुपये दिल्यास मोटर सायकल आणून देतो असे सांगून संबंधित मोटरसायकल मालकाची आर्थिक पिळवणूक सुरू केल्याचा नवा फंडा यावल शहरात दुचाकी चोरट्याने सुरू केला आहे. या दुचाकी चोरट्या संदर्भात यावल पो.स्टे.ला तक्रार करण्यात आली असली तरी तो दुचाकी चोर फरार असल्याने यावल पोलीस हतबल ठरत असल्याचे शहरात बोलले जात आहे.
गेल्या दोन महिन्यात एका एसटी कर्मचार्यांची प्लेटिना मोटरसायकल चोरीस गेली होती, दुचाकी चोरट्याने मोटर सायकल मालकाशी डायरेक्ट संपर्क साधून मोटरसायकल कोणाकडे आहे हे मला माहीत आहे तुम्हाला जर मोटरसायकल परत पाहिजे असेल तर मला दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितल्याने मोटरसायकल मालकाने दोन हजार रुपये देऊन मोटरसायकल परत घेतली यानंतर पुन्हा त्याच दुचाकी चोरट्याने गेल्या महिन्यात प्रवीण जाधव यांची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९.डि.पि. २१५५ चोरून नेली आणि यात सुद्धा दुचाकी चोरट्याने मोटरसायकल मालकाशी संपर्क साधून दोन तीन हजार रुपयांची मागणी करून मोटरसायकल आणून देतो असे सांगितले असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यामुळे त्या दुचाकी चोरट्याला वाटले की, आता हे प्रकरण यावल पोलीसांपर्यंत जाईल.
मोटरसायकल मालकाने यावल पोलिसात तक्रार दिली असल्याने तो दुचाकी चोरट्या गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून फरार झाला आहे.तो दुचाकी चोर कोण आहे हे संपूर्ण यावल शहराला ज्ञात आहे, परंतु दुचाकी चोरट्याला पकडण्यात यावल पोलिस निष्क्रिय ठरत असल्याचे बोलले जात आहे तरी यावल पोलिसांनी त्या दुचाकी चोरट्याचा नवीन फंडा जनतेसमोर आणून दुचाकी चोरावर कडक कारवाई करावी असे बोलले जात आहे.