दीपस्तंभ संस्थेचा उपक्रम; डोळसांनीही घेतले ब्रेल लिपीचे धडे

0
34

जळगाव ः प्रतिनिधी
दीपस्तंभतर्फे लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यात डोळसांनीही ब्रेल लिपीचे धडे घेतले. केवळ सहा टिंबातून संपूर्ण बाराखडी बोटात आली, असा अनुभव या उपक्रमाचा लाभ घेतलेल्यांनी सांगितला. प्रकल्पातील दोघा अंध विद्यार्थ्यांनी १५ दृष्टीहिन सकार्‍यांसह ३० डोळस सहकार्‍यांना ब्रेल लिपी शिकवली.लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त दीपस्तंभच्या मनोबल केंद्रातील दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लुईस ब्रेल यांनी अंधासाठी ही भाषा शोधून अंधांनाही डोळसांच्या रांगेत बसवले आहे. संवेदना ही अंधांना निसर्गाकडून मिळालेली मोठी देणगी आहे. सहा टिंबातून ब्रेल लिपी तयार होते. या सहा टिंबातून अंध व्यक्ती केवळ एक-दोन वाक्य नव्हे तर मोठ-मोठे ग्रंथ तयार करू शकतो. त्यामुळे आपणही ही भाषा शिकावे, असे डोळस विद्यार्थ्यांना वाटते. इतर अंध बांधवांप्रमाणे ही भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न डोळसांनी केला आहे. दीपस्तंभ मनोबल येथे या लिपीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. ब्रेल लिपीमुळे अंध बांधवांची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन श्याम मिस्त्रा व फय्याज अन्वर या अंध असलेल्या ब्रेल लिपीच्या प्रक्षिकांनी १५ दृष्टीहिन सहकार्‍यांसह २५ डोळस व्यक्तींना ब्रेल लिपी शिकवताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेंद्र पाटील, योगेश सूर्यवंशी, हिरा बैरागी यांनी लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. या वेळी दीपस्तंभ मनोबल मधील दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यासह सचिन पाटील व आनंद कोळी उपस्थित होते. संतोष महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here