दिल्ली येथील आंदोलनाला रावेर कॉंग्रेसतर्फे पाठिंबा

0
48

रावेर : प्रतिनिधी

दिल्ली येथे सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या शेती विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी उभारलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आज दि.३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३८ वाजेपासून ते १२.१० वाजे पावेतो रावेर तहसील कार्यालया समोर रावेर तालुका कॉंग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांच्या नेतृत्वात तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात
आले.
यावेळी प्रतिभा मोरे, कांता बोरा, डॉ. शब्बीर खाटीक, संतोष लालचंद पाटील, राजू सवर्णे यांच्यासह २५ ते ३० कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार उषारानी देवगुणे यांना निवेदन देऊन आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला
होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here