शेंदुर्णी, ता.जामनेर ः वार्ताहर
अनेक प्रकारचे दान आहेत. परंतु, त्यामध्येही श्रेष्ट आहे रक्तदान. यामुळे दातृत्वात रक्तदान श्रेष्ट असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन संजय गरूड यांनी विधानसभेचे माजी उपसभापती तथा धी शेंदुर्णी एज्यु. सोसायटीचे संस्थापक कै.आचार्य गजाननराव गरूड यांच्या ३६ व्या व कै.श्रीमती प्रभावती गजाननराव गरुड यांच्या दुसर्या पुण्यतीथीनिमित्त पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबिरात अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केेल
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सीतशराव काशीद, महिला संचालिका सौ उज्वलाताई काशिद, जिल्हा रुग्णालयाचे अधिष्टाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जि.प.सदस्या सरोजिनी संजय गरूड, ज्येष्ट संचालक सागरमल जैन, मौलाना आझाद पतसंस्थेचे चेअरमन शेरू काझी, यु. यु पाटील, पं.स.सदस्य डॉ.किरण सुर्यवंशी, माजी उपसभापती सुधाकर बारी, माजी पं.स.सदस्य शांताराम गुजर, डॉ.अजय सुर्व, अमरीश गरूड, धीरज जैन, फारुख खाटीक, रवी गुजर, प्रदीप धनगर, स्नेहदीप गरूड, अजय निकम, प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील, मुख्याध्यापक एस.पी. उदार, सामान्य रुग्णालय रक्तपेढी डॉ.आकाश चौधरी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.राहुल निकम उपस्थित होते.
प्रारंभी बापुसाहेब गजाननराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी गरुड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फळ वाटप, प्राथमिक शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिर, संस्था संचालित शिक्षक पतपेढीचे उद्घाटन, कालदर्शिकेचे प्रकाशन आदी कार्यक्रम पार पडले.
१०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
भव्य रक्तदान शिबिरामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, महिला संचालिका उज्वलाताई काशिद आणि इतर दात्यांती रक्तदान केले. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत असलेल्या रक्तपेढीत डॉक्टर आणि टिमने रक्त संकलन केले.
ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल
गरूड महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या कार्यकमामध्ये संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंथ स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले होते.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.उदार यांनी बापुसाहेब यांच्या कार्याचा गौरव प्रास्ताविकातून केला. संस्थेचे संचालक सागरमलजी जैन यांनी आपल्या मनोगतातून बापुसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी प्रतिनिधी सक्षम गरूड याने मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव सतिश काशिद यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
बक्षिस वितरणाचे सुत्रसंचालन पी.जी.पाटील यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक एस.सी.चौधरी यांनी मानले. रक्तदान शिबिराचे प्रास्ताविक प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरूड यांनी केले. सुत्रसंचालन उपशिक्षक योगेश पाटील यांनी केले तर आभार उपशिक्षक गुलाब कोळी यांनी मानले.