यावल : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथे एका महिलेची आजारास कंटाळून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.२९ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्यापूर्वी दहिगाव येथील राहणार्या कोकीळाबाई प्रकाश पाटील (वय ६०) यांनी आजाराला कंटाळून नायगाव रोडवरील दहिगाव शिवारातील राजु दगडू पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.
याबाबत मयत महिलेचे मेहुणे छन्नु पाटील (रा.नेरी, ता.जामनेर) यांनी दिलेल्या माहितीनुसार यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहेत.