यावल, प्रतिनिधी । बोलणाऱ्याचे बोंडे विकले जातात ही म्हण सर्वांना प्रचलित आहे परंतु “सत्य” हे सर्वश्रेष्ठ असल्याचा प्रत्यक्ष अनुभव यावलकरांना आला कारण यावल शहरात गेल्या चार पाच दिवसात जसे थंडीचे प्रमाण वाढले तसेच राजकीय वातावरण सुद्धा तापल्याची एक घटना यावल शहरात घडली आहे परंतु हे प्रकरण एका कर्तव्यदक्ष भुऱ्या अधिकाऱ्यापर्यंत न पोचल्याने यावल शहरात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
राजकारणात समाजात किंवा इतर क्षेत्रात एखादा चांगला वक्ता आपला विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी आणि आपल्या विरोधात कोणी काही करू नये म्हणून किंवा आपण अल्पावधीत केलेली कोट्यवधीची कमाई जनतेसमोर येऊ नये म्हणून आपल्या उत्कृष्ट वकृत्व शैलीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून वस्तुस्थितीवर आणि सत्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो,अशाच प्रकारे एकाने एका ठिकाणी भोंगळ कारभार सुरू असल्याची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली असता या वक्त्यांने आपल्या वकृत्व शैलीचा चुकीच्या पद्धतीने मात करून “सत्या”वर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न केला. आणि समोरची व्यक्ती पैशासाठी असे कृत्य करतो असे म्हणत आपण टक्केवारी/लाच घेत नसल्याचे आपल्या गुरूजनांन समोर सांगतले,आणि त्याच्या खोट्या बोलणाऱ्या वक्तव्याला एका प्रतिनिधीने आपल्या अनधिकृत माध्यमातून दुजोरा दिला होता हे सर्वांना ज्ञात असताना आता यावल शहरात ज्या काही घटना घडत आहे त्या जनते समोर का येत नाहीत? असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू असल्याने एका मूक असलेल्या (म्हणजे बोलू न शकणारा मुक्या कार्यकर्त्यास) कार्यकर्त्यांला परमिट रूम बियरबार च्या ठिकाणी एका पदाधिकाऱ्यांने दोन चापटा कानशीलात लगावल्या परंतु त्यावेळेस त्या मुक्या कार्यकर्त्यांने सहनशीलता मौन बाळगले.नंतर मात्र तो मुका कार्यकर्ता एका शुद्ध शाकाहारी हॉटेल जवळ रस्त्यात थांबून त्या पदाधिकाऱ्याची येण्याची वाट बघत होता आल्यानंतर त्या मुक्या कार्यकर्त्यांने त्या पदाधिकाऱ्याचे कान सुद्धा मल्ल पद्धतीने जोरदार शेकले म्हणजे त्या मुक्या कार्यकर्त्याने त्या पदाधिकाऱ्यांच्या कृत्याची त्याला जाणीव करून दिली.ऐन थंडीत आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेता हे सिनेमा स्टाईल कृत्य भुऱ्या अधिकार्यांच्या दालना प्रयन्त पोहोचले नसले तरी यावल शहरात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.
