मलकापूर प्रतिनिधी तालुक्यातील मौजे ग्राम वाकोडी येथील श्रावस्ती बुद्धविहार येथे माघ पौणीमा निमीताने संघमीत्रा उपासक संघा तर्फे धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पु.भंदन्त आनंद महाथेरो नागपुर हे प्रवचनातून धम्मदेसना देताना म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा महान धम्म त्याच बरोबर त्रिशरण पंचशील आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याचे पालन घराघरांमध्ये झाल्याने मानवाचे कल्याण होणार आहे.
यावेळी भन्तेजी यांनी तथागत भगवान बुद्ध ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण केले व बौद्ध उपासक उपासीका याना त्रिशरण पंचशीलाचे महत्व सांगीतले व आर्यअष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे दहा पारमिता विषयावर धम्म प्रवचन केले आहे.
त्यावेळी वाकोडी येथील बौद्ध उपासक राहुल तायडे पोलीस पाटील, गोकुल मोरे , सुनील तायडे, अरुण तायडे यानी परीश्रम घेतले यावेळी आभार प्रदर्शन गोकुल मोरे यांनी केले तर युवा मंडळ,समस्त बौद्ध उपासक, उपासीका तथा बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.