चोपडा ः प्रतिनिधी
तेली समाजाचा मेळावा शिर्डी येथे दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील राहता रोडवरील सिद्धसंकल्प लॉन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील तेली समाजाच्या जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे जळगाव जिल्हाध्यक्ष के.डी.चौधरी यांनी केले.
ते चोपडा येथे नुकत्याच घेण्यात आलेलया तेली समाजाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सभा म्हणजे तेली समाजाचा एक भव्य मेळावाच आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर उपस्थित राहणार आहेत. ही सभा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून या सभेत समाजाच्या विकासाच्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन होणार आहे. अनेक मान्यवरांच्या याठिकाणी भेटीगाठी व विचार व्यक्त होणार आहेत. या मेळाव्याने समाजात नवचैतन्य निर्माण होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात संपर्क दौरा करण्यात आला.
समाज बांधवांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजातर्फे करण्यात आले. चोपडा येथे झालेल्या सभेत नारायण चौधरी, संजय चौधरी, नंदू चौधरी, जे.के. थोरात, प्रशांत चौधरी, अनिल चौधरी, देवकांत चौधरी, चंद्रशेखर चौधरी, श्री.नेरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.