जळगाव ः प्रतिनिधी
तेरापंथ महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आनंददायी जीवनावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शोभा देवी बैद आणि मंजू देवी बैद उपस्थित होत्या. कार्यक्रमात मंडळातील नववधू सदस्या पिंकी छाजेड आणि निशिता डागा यांनी सर्वांना हळदी कुंकू लावून तिळगुळाचे लाडू देत स्वागत केले. कार्यशाळेची सुरूवात सामूहिक नवकार मंत्राचा जप करून करण्यात आली.
मंडळातील सदस्या सुनीता चोरडीया, जयश्री लोढा प्रिया छाजेड आणि हिमांशू सेठिया यांनी सुमधूर आवाजात गीत सादर केले. त्यानंतर डिसेंबर महिन्यात झालेल्या खान्देशस्तरीय संवर्धन कार्यशाळेच्या यशस्वी आयोजना संदर्भात अखिल तेरापंथ महिला मंडळातर्फे प्राप्त संदेशाचे मंत्री रीटा बैद यांनी वाचन केले. निर्मला छाजेड यांनी कार्यशाळेत कोरोनानंतर नव्याने सुरु झालेल्या आनंददायी आयुष्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. उमा सांखला, रानी चोरडिया यांनी मराठी लावणी तर पूजा मालू आणि मीतू धाडेवा यांनी मनोरंजक खेळ घेतले. मोनिका छाजेड यांनी सूत्रसंचालन केले. तारामणि सुराणा यांनी उपस्थितांचे आभार मानले.