तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

0
13
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा पतंग आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. त्यासाठी वेळीच फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के, दुसरी फवारणी 12 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 मिली/हेक्टर गरजेनुसार, तिसरी फवारणी क्लोरोपायरीफॉस 25 मिली अथवा पॉलिट्रीन 20 मिली प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी. 15 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

अळीचे प्रमाण सुरुवातीस जास्त असेल तर 45 टक्के स्पिनोसॅड 162 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 220 ग्रॅम/हेक्टर 500 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच क्रॉपसॅप योजनेतंर्गत क्लोरोपायरिफॉस 20 टक्के व ॲझाडिरेक्टिन 3000 पीपीएम 50 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परमिटव्दारा तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याव्दारे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here