तालुक्यात आधारभुत किंमत तुर खरेदीसाठी ऑनलाईन नाव नोंदणीस आजपासून प्रारंभ

0
23

यावल ः प्रतिनिधी
यंदा २०२०-२०२१ या वर्षाच्या खरीप हंगामात केंद्र शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडचे तूर खरेदी केंद्र यावल, उपअभिकर्ता संस्था म्हणून यावल तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत तूर खरेदीसाठी नावनोंदणीला आज २१ जानेवारी पासून शुभारंभ करण्यात आला आहे.
हेक्टरी खरेदी१२ क्वींटल ३४ किलो व हमीभाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे राहणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपले नाव नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, तुर पिकाचा ऑनलाईन चालू खरीप हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला ७/१२उतारा घेऊन संस्थेशी संपर्क करावा.
शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे,त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी. अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते असे या सर्व माहीती व सुचनांचे पालन शेतकरी बांधवांनी करावे असे आवाहन तालुक्यातील सर्व तुर उत्पादक शेतकरी बांधवांना कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here