तालुक्यातील वाघळी येथे सव्वा नऊ लाखांचा गुटखा जप्त, गुन्हा दाखल

0
40

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी येथील रोडवर रात्रीच्या सुमारास अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील वाघळी ते हिंगोणे रोडवर पोलिसांनी साधारण सव्वानऊ लाखांचा अवैध गुटखा पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोना शांताराम सीताराम पवार तसेच पोलीस स्टाफ शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना अवैध गुटखा व पानमसाला पकडला असून ९ लाख २३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अजय नारायण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक असे की, दि. ३ जानेवारी २०२२ रात्री २ वाजेच्या सुमारास वाघळी ते हिंगोणे रोडवर पोना शांताराम सीताराम पवार व तसेच पोलीस स्टाफ असे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना अजय नारायण पाटील (रा. हनुमान वाडी, ता. चाळीसगाव) हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीच्या पांढरा रंगाचे गाडी क्र. एम. एच. १९ सीवाय ४१४८ याच्यात स्वतःच्या आर्थिक फायदा साठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मानवी आरोग्यास घातक अपायकारक असलेला तंबाखूजन्य सुगंधित गुटखा पदार्थाची अवैध वाहतूक करताना मिळून आला. यात २०० पाकिटे विमल पानमसाला तंबाखू व ५ लाख रुपये किंमतीचा एक पांढऱ्या रंगाची अशोक लेलँड कंपनीची चार चाकी गाडी असा एकूण ९ लाख २३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोना शांताराम सीताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अजय नारायण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here