Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»तालुक्यातील दोन ठिकाणी सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त
    क्राईम

    तालुक्यातील दोन ठिकाणी सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त

    saimat teamBy saimat teamOctober 29, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील दोन ठिकाणी पोलिसांनी छापे मारून सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांना चोपडा तालुक्यात दोन ठिकाणी अवैध शस्त्रविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तालुक्यातील खार्‍या पाडाव शिवारातील उमर्टी ते वैजापूर रस्त्यावरील टेकडीजवळ सतनामसिंग महारसिंग जुनैजा (२२, रा. उमर्टी, जिल्हा बडवाणी) याच्याकडून ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल तसेच मॅगझीनसह चौदा जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

    यासोबत त्याला अटक करण्यात आली आहे. दुसर्‍या छाप्यामध्ये चोपडा ते धरणगाव रोडवरील हॉटेल विश्व समोर ७५ हजार रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल व दहा जिवंत काडतूस बाळगणार्‍या अक्षय महाले (वय २५, रा. चोपडा), विजय पाटील (वय ३२, रा. चोपडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर हॅप्पी उर्फ प्रवीण शिकलकर (वय ३५, रा. उमर्टी, मध्यप्रदेश) हा फरार झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असून चौथ्या फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच वेळेस सहा गावठी कट्टे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.